गणेश विसर्जनाच्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या पाइपलाईन कामांबाबत तातडीने उपाययोजना करा – मोहनेतील शाखाप्रमुख रोहन कोट यांची महापालिकेकडे मागणी

Whatsapp image 2025 07 29 at 9.05.11 am

टिटवाळा :  मोहने येथील अमृत योजना अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आलेल्या नवीन पाइपलाईनमुळे गणेश मूर्ती विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक गणेश घाट रस्त्यावर अडथळा निर्माण झाला आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शिंदे गटाचे मोहणे (वार्ड क्रमांक १४) चे शाखाप्रमुख रोहन कोट यांनी केली आहे. कोट यांनी महानगरपालिका प्रशासनास लेखी निवेदन देऊन गणेश घाटापर्यंत विसर्जनासाठीचा रस्ता लवकरात लवकर तयार करण्याची विनंती केली आहे. अमृत योजनेअंतर्गत उल्हास नदी पात्रातून इतर महानगरपालिका क्षेत्रात पाणी उपसा करण्यासाठी मोठ्या पाइपलाईन टाकण्यात आल्या असून, यामुळे पारंपरिक गणेश विसर्जन स्थळावर अडथळा निर्माण झाला आहे. मोहणे येथील हा घाट अनेक वर्षांपासून घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी वापरला जात आहे.

या पार्श्वभूमीवर रोहन कोट यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दिनांक २८ जुलै रोजी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, जल अभियंता, प्रकल्प अभियंता तसेच अ/१ प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना लेखी निवेदन दिले. यामध्ये त्यांनी गणेश विसर्जनपूर्वी आवश्यक रस्ता दुरुस्ती करून भाविकांना होणाऱ्या गैरसोयीपासून मुक्त करण्याची मागणी केली आहे. शहरवासीयांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कामे हाती घ्यावीत, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *