निलेश कासट : खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार सोहळ्यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, टोकावडे येथील मुख्याध्यापक पोपट बाबाजी चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण समारंभ दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी खेड येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात पार पडला. या सोहळ्यास खेड तालुक्याचेआमदार बाबाजी शेठ काळे, शिक्षक आमदार जयंत साळगावकर, माजी आमदार दिलीप अण्णा मोहीते, माध्यमिक शिक्षण अधिकारी पुणे शकारेकर साहेब, प्राथमिक शिक्षण अधिकारी पुणे श नाईकडे साहेब, गटशिक्षणाधिकारी खेड अमोल जंगले साहेब, तसेच मुख्याध्यापक संघ खेडचे अध्यक्ष उत्तमराव पोटवडे, कार्याध्यक्ष रामदास रेटवडे यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मान्यवर उपस्थित होते.

पोपट चव्हाण यांची शैक्षणिक सुरवात पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेमधून झाली. अतिशय दुर्गम आदिवासी ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यानंतर त्यांनी डहाणू आश्रम प्रकल्पातील आश्रम शाळेत अध्यापनाचे काम केले. ते अतिशय शिस्तप्रिय व हुशार व्यक्तीमत्व असल्याने डहाणू प्रकल्प कार्यलयाने त्याच्यावर सहाय्यक शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून कार्यभार दिला होता. आश्रमशाळेत शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार बहाल करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी चव्हाण सरांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.














Leave a Reply