महाड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा वर्धापन दिनाची जय्यत तयारी…

Image (15)

कर्जत मधील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार

कर्जत, प्रतिनिधी, नितीन पारधी 

कर्जत तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कार्यकर्त्यांची कर्जत मध्ये महाड येथे ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाची जयत तयारी करिता महत्वाची बैठक रविवार, दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कर्जत मधील महीला मंडळ सभागृह येथे पार पडली. या बैठकीस कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे ,रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य सुमित मोरे, कोकण प्रदेश संघटक मारुती गायकवाड ,जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक , पनवेल महानगर जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अमोल इंगोले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या रायगड रत्नागिरी स्थानिक मॅनेजमेंट कमिटीवर निवड झाल्याबद्दल कर्जत मध्ये जाहीर सत्कार करण्यात आला.
या बैठकीत ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त आला .या बैठकीला उपस्थित आरपीआयचे ज्येष्ठ नेते दीपक भालेराव, खोपोली शहर युवक अध्यक्ष रुपेश रुपवते, कर्जत शहराध्यक्ष अरविंद मोरे,कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड कर्जत तालुका सचिव राजू जगताप, कर्जत तालुका युवक अध्यक्ष अमर जाधव, कर्जत तालुका युवक सचिव राहुल गायकवाड, कर्जत तालुका महिला अध्यक्षा सुरेखा ताई कांबळे, कर्जत महिला शहराध्यक्षा वैशालीताई भोसले, कर्जत तालुका महिला सचिव मीनाताई काकडे , माथेरान महिला शहराध्यक्ष मनीषा शिंदे, प्रस्ताविक जिल्हा सचिव सुनील सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र युवक कार्यकारणी सदस्य ॲड उत्तम गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *