राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत

Whatsapp image 2025 09 29 at 4.37.48 pm

कर्जत (प्रतिनिधी) : नितीन पारधी 


कर्जत तालुक्यातील राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बॉबी शेठ वाघमारे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कर्जत शहर उपाध्यक्ष नीरज गायकवाड यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे शिवसेना परिवारात सहर्ष स्वागत केले. “आगामी काळात आपण एकत्रितपणे काम करून शिवसेना आणखी बळकट करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यास नगरसेवक ॲड. संकेत भासे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे, कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, उपशहर प्रमुख दिनेश कडू आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रवेशामुळे कर्जत शहरातील शिवसेनेची ताकद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *