चंद्रकांत देसले
(डोळखांब / प्रतिनिधी)
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, डोळखांब येथे रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत शनिवार, 3 जानेवारी 2026 रोजी वार्षिक स्नेह संमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक श्री. काका जगे हे होते. तसेच सतीश अधिकारी, महेश तिवार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, चंद्रकांत चंद्रराव, मुंबई परीक्षा मंडळाचे श्री मनोहर पवार, ॲड .विनायक कोंगेरे, पुष्कराज कोंगेरे, विनायक साबळे, जगदीश पवार ,कीर्ती क्रिएशनच्या कीर्ती शेवाळे व अनिल शेवाळे सचिन चौधरी तसेच विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी व संस्थेचे मान्यवर पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटिका, समूहगीत, देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर शैक्षणिक वर्षात विविध परीक्षा, क्रीडा स्पर्धा व उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व पारितोषिके देऊन गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
मुख्याध्यापकांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे विभागीय अधिकारी श्री. मोहन कोंगेरे सर यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शहापूर तालुक्याचे सुपुत्र व शहापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. हिराजी वेखंडे यांचा सन्मानपत्र देऊन विद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन श्री. विकास भाई चौधरी व ज्येष्ठ सदस्य नंदकुमार डोहळे यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे विद्यालयातर्फे सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम निवेदक जगदिश विशे सर यांनी केले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा स्नेह संमेलन व गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा ठरला, अशी प्रतिक्रिया पालक व उपस्थितांनी व्यक्त केली.













Leave a Reply