श्री गणरायाचे व विठ्ठल–रुक्माईचे दर्शन घेऊन टिटवाळ्यात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ, जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

Whatsapp image 2026 01 05 at 5.05.39 pm

टिटवाळा : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका सन 2025 अंतर्गत येत्या 15 जानेवारी 2025 रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर टिटवाळा परिसरात महायुतीच्या प्रचाराचा आज भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला.

भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन सेना व लहुजी सेनेच्या महायुतीतर्फे प्रभाग क्रमांक 3 मधील चार उमेदवारांनी प्रचाराची सुरुवात श्री क्षेत्र महागणपती मंदिर, टिटवाळा येथे श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करून केली. त्यानंतर विठ्ठल–रुक्माई मंदिरात** दर्शन घेऊन लोककल्याण, विकास व विजयासाठी साकडे घालण्यात आले.

प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपाच्या उमेदवार व माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, संतोष तरे, शिवसेनेचे बंदेश जाधव तसेच हर्षाली चौधरी / थवील हे महायुतीचे चार अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
यामध्ये –
प्रभाग 3 अ : बंदेश जाधव
प्रभाग 3 ब : हर्षाली चौधरी / थवील
प्रभाग 3 क : उपेक्षा भोईर
प्रभाग 3 ड : संतोष तरे
असे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.

यानंतर टिटवाळा येथील निमकर नाका परिसरात महायुतीच्या उमेदवारांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या शुभहस्ते, तसेच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

उद्घाटनानंतर उमेदवार परिचय पत्रकांचे वाटप करण्यात आले. उमेदवारांनी घरोघरी व परिसरात फिरून मतदारांशी थेट संवाद साधत जनसंपर्क वाढवला. नागरिकांच्या समस्या, अपेक्षा जाणून घेत विकासाभिमुख व लोकहिताच्या मुद्द्यांवर महायुतीचा स्पष्ट दृष्टिकोन मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आला.

कार्यालय उद्घाटनप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख रवि पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, मंडळ अध्यक्ष सोपनील काटे, शिवसेनेचे श्रीधर खिसमतराव, ज्ञानेश्वर मढवी, शक्तीवान भोईर, किरण रोठे, रिपाइंचे शहर अध्यक्ष विजय भोईर, युवा अध्यक्ष सनी जाधव, माजी नगरसेविका अपेक्षा बंदेश जाधव, मधुकर भोईर, ज्ञानेश्वर भोईर, मनिषा केळकर, रमण तरे, विजय चौधरी, आनंता पाटील यांच्यासह शिवसेना–भाजप–रिपाइंच्या महायुतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धार्मिक श्रद्धा, संघटनात्मक ताकद आणि विकासाचा ठोस अजेंडा घेऊन सुरू झालेल्या या प्रचारामुळे टिटवाळा परिसरात महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, येत्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *