श्रीमती मीनल चौहान विद्यालय, चिखलगाव येथे लर्निंग लिंक्स फाउंडेशन आयोजित विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

Whatsapp image 2026 01 29 at 7.08.24 pm

चंद्रकांत देसले /शहापूर

लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्या वतीने श्रीमती मीनल चौहान विद्यालय, चिखलगाव येथे दि 28 भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित नाविन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्प सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या विज्ञान प्रदर्शनात पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, सौरऊर्जा, प्रदूषण नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य व दैनंदिन जीवनाशी संबंधित विज्ञान प्रयोगांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मॉडेल्सद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि संशोधन वृत्तीचे दर्शन घडविले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे कौतुक करत, विज्ञान शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता प्रयोगशील असावे, असे मत व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले. या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी लर्निंग लिंक्स फाउंडेशन, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *