जिजाऊचे ठाण्यात योगा प्रशिक्षण केंद्र

ठाणे : योगा दिनाचे औचित्य साधून योग साधना वाढीस लागून त्याचे महत्व लोकांना कळावे तसेच विशेष महिलांना करून आजच्या धावपळीच्या युगात आपल्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष टाळता यावे या हेतूने जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत योगा प्रशिक्षण केंद्र चालू करण्यात आले. जिजाऊ संस्थेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मोफत योगा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज दिनांक 21 जून शुक्रवार रोजी सकाळी ७ वाजता, रामनगर दिघा नवी मुंबई येथे करण्यात आले. तसेच याप्रसंगी आज योगा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात देखील करण्यात आलेले होते. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

नियमित योगा केल्यामुळे आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतली जाते. म्हणूनच योगाचे आपल्या मानवी जीवनात विशेष असे महत्व आहे. याबाबत जनजागृती व्हावी . यासाठी संपूर्ण जगभर योगा दिन साजरा केला जातो . योगा निरोगी शरीर, मनशांती आत्मिक सामर्थ्यवाढीसाठी अत्यंत उपयोगी अशी साधना आहे. . ह्यामुळे मानसिक स्थिरता, उत्साह आणि आरोग्यदायी शांतता प्राप्त करता येते . योगाच्या अभ्यासामुळे त्यामुळे शरीर, मन समग्रपणे विकसित होतात.जिजाऊच्या चालू करण्यात आलेल्या या योगा प्रशिक्षण केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *