शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतून देणार नाही -अपक्ष उमेदवार नागेश निमकर

डोंबिवली ( शंकर जाधव ) :

निवडणुकीच्या कामात शिक्षकांना गुंतविले जात असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र शिक्षकवर्ग आपली नाराजी उघड उघड नाराजी व्यक्त करू शकत नाही. त्यावर कोकण पदवीधर निवडणूकित अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांनी निवडून आल्यावर डोंबिवलीत पत्रकार परिषदेत शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतून देणार नाही असे आश्वासन दिले.

कोकण पदवीधर निवडणूकित अपक्ष उमेदवार नागेश निमकर पत्रकार परिषदेत म्हणाले, शिक्षकांना निवडणूक काळात गुंतवून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास झाला त्याबद्दल आवाज उठविणार शिक्षकांना या त्रासातून मुक्तता व्हाव्ही यासाठी या विषयावर पाठपुरावा करणार आहे.
मागील काळात पदवीधर मतदार संघ निवडणुकीत जे उमेदवार निवडून आले होते, त्यांची कामे पाहता त्यांनी पाच जिल्ह्यांचा विकास सोडा, ठाणे शहराचा विकासही केलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काहींना कर्तव्ये, अधिकार यांची देखील माहिती नाही. असे उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत. मी अवघा कोकण भाग पालथा घातला असून तेथील समस्या आणि गरजा यांचा पूर्ण अभ्यास मी केलेला आहे. त्यासाठी या पूर्वीच मी पाठपुरावा सुरू केला असून भविष्यात अनेक कामे दृष्टिपथात आहे. मला मतदारांनी संधी दिली तर पदवीधर आणि जनतेचा आवाज विधान
परिषदेत बुलंद होईल.

मी सत्तेत नसतानाही जनतेसाठी अनेक सामाजिक कामे केलेली आहेत. या कामाचा आढावा सर्वांसाठी माझ्या संकेतस्थळावर पहाता येईल कोकण पदवीधर निवडणूकित अपक्ष उमेदवार म्हणून सर्वांची ओळख व्हावी यासाठी पाचही जिल्ह्यातील मतदारांशी संवाद साधला आहे. या व्यतिरिक्त माझा जाहीरनामा लाखो मतदारांना पोच झाला असून काही मतदारांनी याची पोचही दिली आहे. प्रत्येक पक्षात माझी जवळीक असून त्याचा फायदा मला निश्चित होईल. काहींच्या मते मी मातब्बर अशा पक्षाचा उमेदवार व्हायला पाहिजे होतात असा सल्लाही दिला असेही निमकर यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *