केडीएमसीच्या वतीने १०वी, १२वी च्या विद्यार्थ्याना करियर मार्गदर्शन   

करीअर मार्गदर्शन प्रशिक्षणाचा आयुष्यातील चांगले निर्णय घेण्यास उपयोग होईल

–    महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़

कल्याण आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा आयुष्यातील चांगले निर्णय घेण्यास उपयोग होईल, असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका व आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजिलेल्या “करिअर मार्गदर्शन” या कार्यक्रमात बोलताना महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले.

शाळेत मुले शिकतात व महाविद्यालय विद्यार्थ्यांना घडविते त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढील प्रोफेशन निवडताना काळजीपूर्वक निवडावे अशाही सूचना त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिल्या.

आपले कौशल्य व ज्ञान अद्यावत केले तर यशप्राप्ती फार दूर नाही. यशस्वी करिअरसाठी प्रथम स्वप्न बघायला शिकावे, सवयी चांगल्या असतील तर यश लवकर मिळेल, आपले पॅशन ओळखायला शिका आणि योग्य करिअर निवडा,‍ करिअरसाठी विचारपूर्वक आखणी करुन आपले उद्दीष्ट्ये निश्चित करा, असे आपल्या ओघवत्या भाषा शैलीत विविध उदाहरणांच्या आणि सादरीकरणांच्या माध्यमातून सांगत आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेचे प्रशिक्षक नील पांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.

आर्ट ऑफ लिव्हींगच्या प्रशिक्षक कृतीका यांनी देखील उद्भोदक गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केले. या कार्यक्रमास १०वी व १२वी च्या विद्यार्थी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाची सांगता महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी घेतलेल्या ऊॅंकार,  भस्रिका प्राणायाम  आणि ध्यानाने करण्यात आली. शिक्षणाधिकारी  विजय सरकटे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *