जे एम एफ शिक्षण संस्था संचलित वंदे मातरम् पदवी महाविद्यालयात NAAC B++ CGPA 2.91 दर्जा श्रेणी चा जल्लोत्सव

डोंबिवली ( शंकर जाधव) 
राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ही संस्थानाच्या गुणवत्ता दर्जाला समजण्यासाठी महाविद्यालय, विश्वविद्यालय, आणि इतर मान्यता प्राप्त विद्यालय त्यांच्या उच्च स्तरावरील मूल्यांकन आणि मान्यता ची व्यवस्था करते, तसेच विद्यार्थ्यांसाठी सुविधा लक्षात घेऊन त्या पुरविण्याचा प्रयत्न करते. जे एम एफ शिक्षण संस्था संचलित वंदे मातरम् पदवी महाविद्यालय येथे दिनांक १३ आणि १४ जून रोजी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ( NAAC) समिती ने हजेरी लावली होती.
     समिती पदावर रुजू असलेले उच्च पदाधिकारी अध्यक्ष , प्राध्यापक डॉ धरमेंधर कुमार, ( हरियाणा )समन्वयक निबंधक, डॉ जोगेश काकटी , ( आसाम )सदस्य मुख्याध्यापक डॉ अनिलकुमार सुरेंद्र ( कर्नाटका)  ह्या मान्यवर व्यक्ती वंदे मातरम् पदवी महाविद्यालयात महाविद्यालयाची तपासणी करण्यासाठी त्यांचे आगमन झाले होते. संस्थेचे अध्यक्ष व वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाचे निबंधक डॉ राजकुमार कोल्हे व सचिव डॉ सौ प्रेरणा कोल्हे यांनी मान्यवरांचे प्रवेशद्वारात च टिळा लावून व ओवाळून , फुलांच्या पाकळ्या वर्षावून , ढोल, ताशांच्या गजरात स्वागत केले.
     नैसर्गिक जबाबदारी आणि कर्तव्य , व जागरूकता म्हणून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण  करण्यात आले. संस्थेचे संघटन, जबाबदारी, कर्तव्य , बांधिलकी , नियोजन ह्या विचारांचा समावेश असणे गरजेचे आहे. आणि हेच विचार अस्तित्वात आणून संस्था आणि विद्यार्थी , शिक्षक वर्ग कार्यरत असतो. मान्यवरांचे स्वागत झाल्यावर उपस्थित असलेले पदाधिकारी , सदस्य यांनी वंदे मातरम् महाविद्यालय च्या प्रत्येक शाखा, प्रयोगशाळा, संगणक विभाग आणि इतर विभागास भेट देऊन तेथील व्यवस्थापन व माहिती पडताळून बघितली. संस्थेचे अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे  त्याच बरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य  नाडर,मान्यवरांच्या बरोबर होते तर उप प्राचार्या वनिता लोखंडे,प्राध्यापिका मंजुळा, तसेच इतर प्राध्यापक  यांनी समिती सदस्यांना सर्व विभागाची उत्कृष्ट रित्या विश्लेषण करून दिले.
     दिवसभराच्या कामकाजाच्या व्यापामधून संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले त्यामधे विद्यार्थ्यानी केलेल्या नृत्यांमुळे महाविद्यालयात सांस्कृतिक वातावरण तयार झाले व सर्वांनी  कार्यक्रमाचा आनंद घेतला. शैक्षणिक, अध्यापन सांस्कृतिक,  संशोधिका ह्या सर्व गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी  ” NAAC”  राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद महाविद्यालयात बोलावली जाते. संस्थेचे उद्दिष्ट हेच की वंदे मातरम् महाविद्यालय मध्ये जास्तीत जास्त सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, आपल्या महाविद्यालयाचा दर्जा उच्चपटी ने वाढवणे हेच ध्येय आहे, असे सांगून डॉ राजकुमार कोल्हे यांनी समिती सदस्यांना विश्वास दाखवला.  दोन्ही दिवसाच्या कामकाजामध्ये मूल्यांकन, मूल्यमापन ,संशोधन, स्पष्टीकरण,  विचारांची देवाघेवाण, विद्यार्थ्यांचे भविष्याबाबत नियोजन या सारख्या व इतर अनेक शैक्षणिक विषयावर दुसऱ्या दिवशी चर्चासत्र आयोजित करण्यात आले.  महाविद्यालयाचे सुसज्ज यंत्रणा, टापटीप पणा, समयसूचकता, कामकाजाची परिपूर्णता ह्या सर्व गोष्टींची दाखल घेऊन समिती सदस्यांनी काही सकारात्मक निर्णय घेतले.दोन दिवसाच्या कामकाजामध्ये पडताळणी करून वंदे मातरम् महाविद्यालयाला  NAAC समितीने ” B++ ” CGPA 2.91 ह्या दर्जाच्या श्रेणीने नामांकन मिळाले. या यशाचे  श्रेय  वंदे मातरम् महाविद्यालयाचे प्राचार्य,  उप प्राचार्या, समन्वयक, सर्व प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी, यांना दिले जाते. शिक्षण आणि संस्कृतीचे माहेरघर असलेल्या डोंबिवली शहरामध्ये ” वंदे मातरम् पदवी महाविद्यालय च्या शिरपेचात यशाचा आणि मानाचा तुरा खोवला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *