नवभारत साक्षरता अभियान, शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या विविध योजना आणि शिष्यवृत्ती तसेच सरल, यु-डायस, आधार अपडेट या महत्वाच्या विषयांची सभा संपन्न 

कल्याण : महाराष्ट्र शालेय शिक्षण (योजना) विभागाच्या सूचनेनुसार शैक्षणिक नवीन वर्ष 2023- 24 साठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने अत्रे रंगमंदिर कल्याण या ठिकाणी  सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. ही सभा इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेली होती.  सर्व सीआरसी प्रमुख तसेच कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक सभेसाठी उपस्थित होते.
या  सभेत  भावना राजनोर शिक्षणाधिकारी योजना, यांनी विद्यार्थी लाभाच्या योजनाची माहिती दिली, जि.प. ठाणे ,  मोहिते साहेब उपशिक्षणाधिकारी माध्य.जि. प. ठाणे , विजय सरकटे शिक्षणाधिकारी क.डों. मनपा शिक्षण विभाग, यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रम व इतर प्रशासकीय विषयांची माहिती दिली. या सभेस क.डों.मनपा शिक्षण विभागाचे  राजेंद्र जाधव,नोडल अधिकारी नवभारत साक्षरता,चंद्रमणी सरदार ,विषयतज्ञ,  चंदन माने ,
डेटा एन्ट्री ऑपरेटर,  विलास लिखारसर, टेक्नोसेव्ही टेक्निशियन यांनी आपापल्या विषयाचे सखोल मार्गदर्शन केले. या सभेचे  आयोजन शिक्षण विभाग  कडोंमपा याच्या मार्फत करण्यात आलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *