निरंजन डावखरे यांना कल्याण पश्चिमेतून चांगला प्रतिसाद – नरेंद्र पवार, माजी आमदार

 

कल्याण : कुणाल म्हात्रे 

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना कल्याण पश्चिमेतील मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार पवार यांनी कल्याण पश्चिमेतील आणखी काही नामांकित शाळांना भेट दिली.

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून त्याच्या प्रचाराने चांगलाच जोर धरल्याचे दिसून येत आहे. निरंजन डावखरे हे सलग तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत असून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकदून डावखरे यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज कल्याणातील सुभेदार वाडा हायस्कूल, अभिनव विद्यामंदिर, शारदा मंदिरसह एल. डी. सोनवणे कॉलेजला भेट देऊन तिथल्या शिक्षकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच निरंजन डावखरे यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

दरम्यान या भेटीवेळी एल. डी. सोनवणे महाविद्यालयाकडून अनुदानाबाबत माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे मागणी केली. नैसर्गिक वाढीने टप्पा अनुदान मिळण्यासाठी सरसकट या शब्दाऐवजी प्रचलित शब्द वापरला जावा आणि सोनवणे महाविद्यालयाचे थकीत टप्पा अनुदान एक वर्षापूर्वीच्या फरकाने मिळावे अशा दोन महत्त्वाच्या मागण्या सोनवणे महाविद्यालयाकडून करण्यात आल्या. त्यावर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी लगेचच सकारात्मक प्रतिसाद देत पदवीधर मतदारसंघ निवडणूक झाल्यानंतर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या दालनात बैठक लावून हे प्रश्न तातडीने मार्गी लावू असे आश्वासन दिले. ज्यावर सोनवणे महाविद्यालयाच्या उपस्थित शिक्षकांनी आनंद व्यक्त करत नरेंद्र पवार यांचे आभार मानले.

     यावेळी भाजपा प्रदेश संयोजक शिक्षक आघाडी विकास पाटील, प्राचार्य सुभेदार हायस्कूल मीठ मेटकरी, संचालक मंडळ सदस्य जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रसाद सरदेसाई, शिक्षक क्रांती संघटना गजानन पाटील, अभिनव विद्यामंदिर मुख्यध्यापक संपद गीते, शारदा विद्या मंदिर हायस्कूल मुख्यध्यापिका वैशाली देशमुख, सोनवणे कॉलेज उपप्राचार्य पडवेकर, थॉमस शिनगारे आदी शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *