टिटवाळा : थोर समाज सुधारक, अध्यात्म व शिक्षण प्रचारक राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न भगवानबाबा आणि वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन राष्ट्रसंत भगवानबाबा सेवा मंडळ, टिटवाळा यांच्यावतीने प्रथमच मांडा-टिटवाळा येथे करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, १७ जानेवारी पासून सुरु असलेल्या या सोहळ्याची सांगता रविवार, १९ जानेवारी रोजी सकाळी ९:३० ते ११:३० या वेळेत काल्याचे कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे अग्निशमन केंद्र (KDMC) कार्यालयाच्या पाठीमागे, क्लब हाऊसच्या बाजूला, रिजन्सी सर्वम, गणेश मंदिर रोड, मांडा, टिटवाळा (पूर्व), या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून राष्ट्रसंत भगवानबाबा सेवा मंडळ, टिटवाळा यांच्या वतीने सर्व श्रद्धाळू भक्तांना आणि अनुयायांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.














Leave a Reply