मांडा-टिटवाळ्यात आयुष्यमान भारत आरोग्य केंद्राचे भूमिपूजन संपन्न

Whatsapp image 2025 11 02 at 12.51.34 pm

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन

टिटवाळा: मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने आणि माजी उपमहापौर तसेच नगरसेविका उपेक्षा शक्तीवान भोईर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या आयुष्यमान भारत आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज (रविवार, 2 नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
हा समारंभ रिजन्सी सर्वम क्लब हाऊस समोर पार पडला. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उभारले जाणारे हे आरोग्य केंद्र स्थानिक नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणार आहे.
या केंद्रामुळे टिटवाळा आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना प्राथमिक उपचार, तपासण्या आणि आरोग्य मार्गदर्शनासाठी शहराबाहेर जाण्याची गरज उरणार नाही. आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी हे केंद्र मोलाचे ठरणार असल्याचे यावेळी माजी आमदार पवार यांनी सांगितले .
कार्यक्रमाचे आयोजन भाजपा टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तीवान भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. भूमिपूजनानंतर परिसरात विकास व आरोग्यविषयक उपक्रमांना नवसंजीवनी मिळेल, अशी भावना यावेळी माजी उपमहापौर व नगरसेविका भोईर यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी माजी नगसेवक सुरेश भोईर , माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत , परेश गुजरे किरण रोठे , दीपकभाऊ कांबळे , रुपेश भोईर , विनायक भोईर , अनिल फड विजय आव्हाड यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *