राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा अल्पवयीन मुलाचा प्रताप 

अल्पवयीन कारचालक मुलाची चारचाकीला धडक
कल्याण : आंबिवली मधील अटाळी मध्ये एका अल्पवयीन कारचालक मुलाने चारचाकीला धडक दिली. चार चाकी चालकाने जाब विचारल्यावर या अल्पवयीन मुलाने आपल्या काही मित्रांना बोलावून आधी कारची तोडफोड केली. त्यानंतर कार चालकाला मारहाण केली. या अल्पवयीन मुलाचे वडील हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत . माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे.
दरम्यान कल्याण पश्चिमेतील अटाळी परिसरात एका कारने दुसऱ्या एका कारला धडक दिली. धडक देणारी कार एक अल्पवयीन मुलगा चालवित होता. ज्या कारला त्याने धडक दिली. तो कार चालक हे गाडीतून खाली उतराला. त्यांनी कारचालक मुलाला याचा जाब विचारला परंतु अल्पवयीन मुलाने चूक मान्य न करता कारचालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलाने त्वरीत आपल्या काही मित्रांना बोलावून घेतले. गाडीची तोडफोड केली आणि त्यानंतर कार चालकाला मारहाण देखील केली आहे. गाडीचा परवाना नसताना या अल्पवयीन मुलाने अशा प्रकारची वागणूक करून चालकाला मारहाण केली आहे. कारचालकाने पोलिसांना मदतीसाठी फोन केला. दहा मिनिटात खडकपाडा पोलीस घटनास्थळी पोहचले. दोघांना खडकपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
त्यानंतर या अल्पवयीन मुलाचे वडिल हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे असे समोर आले. या प्रकरण  खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडिल आणि अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात झालेल्या घटनेनंतर कल्याणमध्ये घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने वडिलांच्या पदाचा वापर करीत हा प्रकार केला आहे. मुलाचे वडील हे एका पक्षाचे कार्यकर्ता आहे. आपल्याकडे पैसै आहेत. या समजूतीपोटी अल्पवयीन मुले कशा प्रकारची वागणूक परिसरमध्ये करतात ही बाब या घटनेतून समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास खडकपाडा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *