शहापुर – डोळखांब : चंद्रकांत देसले
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात रामानंद संप्रदायाचे जागृत संत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे भव्य आणि भक्तिमय आयोजन करण्यात आले आहे. हा पावन सोहळा सोमवार, २२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे.
या विशेष कार्यक्रमासाठी साय भगवान लॉन्स अँड शहापूर किन्हवली रोड, गोठेघर, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे हे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. या सोहळ्यात हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे. या पादुका दर्शन सोहळ्याला उपासक दीक्षा व आध्यात्मिक प्रवचनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
रामानंद संप्रदायामार्फत आयोजित या कार्यक्रमात धर्म, अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे. महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातून तसेच राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रामानंद संप्रदाय, जिल्हा ठाणे शहापूर ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आले असून सर्व उपासक, भक्तगण व धर्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पावन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. याचं कार्यक्रमात कृषी उपक्रमातर्गत 31गोरगरीब गरजू शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वाटप करण्यात येणार आहे













Leave a Reply