अमर मिसाळला बेड्या
कर्जत प्रतिनिधी, नितीन पारधी
विरार-अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर प्रकल्पासाठी विंधणे येथील शासकीय जमीन हडप करून परस्पर विकणारे कर्जत पंचायत समितीचा माजी सभापती अमर मिसाळ याला अखेर अटक झाली आहे. सात महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर अमर फरार झाला होता. राजकीय आशीर्वादाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लपून बसणाऱ्या अमरला न्हावाशेवा पोलिसांनी कर्जत येथून बेड्या ठोकल्या. फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी मंडळ अधिकारी मनीष जोशी यांच्यामार्फत न्हावाशेवा बंदर पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२४ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी
दहा आरोपींवर गुन्हा दाखल केला. सात महिन्यांत याप्रकरणी १० पैकी आरोपी वेणी ब्रायन डिसोजा (बनावट गेलाराम भुरोमल), संकेत पाटील, संतोष मराठे, बोगस गेलाराम भोरॉममल, दत्ता कमदुकर, संतोष पांडे, नबिजात अन्सारी यांना अटक करण्यात कोठडीत असताना या कटाचे मुख्य सूत्रधार आणि कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्ती कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ, आहेत राजेश नाविक, अजित भंडारी हे तिघे मात्र पोलिसांना सापडत नव्हते. हे तिन्ही आरोपी गेले सात महिने मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता.
फसवणुकीचा नेमका प्रकार काय?
विंधणे येथील सरकारी जमिनीचे मालक असल्याचे भासवून जमिनीच्या नोंदी सातबारावर करून घेतल्या होत्या. त्यातच शासनाच्या मालकीची ही जमीन संगनमताने शासनाच्या अलिबाग-विरार कॉरिडॉर प्रकल्पासाठी विकून शासनाचे एक कोटी ३६ लाख ६३ हजार ७०० रुपयांना चुना लावला होता.













Leave a Reply