वीज कंत्राटी कामगारांचे 9 जुलैला आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन
कल्याण : कुणाल म्हात्रे
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही या मुळे कामगार वर्गात तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोष ला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ दि 9 जुलै रोजी आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शने करणार आहेत. याची नोटीस मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, कामगार मंत्री, वीज कंपनीचे प्रशासन यांना नोटीस दिली असल्याची माहिती महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.
27 जून रोजी सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी सरकार जगाओ आंदोलनाचा भाग म्हणून राज्यातील सर्व मंत्री आमदार व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन कंत्राटी कामगारांच्या विविध विषयांवर विधी मंडळात आवाज उठवून कामगारांना न्याय द्यावा या करिता निवेदन देवून जागृत करणार आहे. तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांची पगारवाढ करावी, वेतन एक समान करावे, नोकरीत जॉब सिक्युरिटी मिळावी या साठी हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा, नवीन भरतीमध्ये कुशल व अनुभवी कामगारांना वयात सवलत, नोकरीत विशेष आरक्षण व प्राधान्य मिळावे या मागण्यावर मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत चर्चा होऊन निर्णय झाले मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने कामगार नाराज आहेत.
त्यामुळे तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगार अन्यायाला वाचा फोडुन सरकारला जागे करण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून विधानसभा अधिवेशना दरम्यान 9 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन मध्ये वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवहान करणार असल्याचे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी यांनी केले आहे.
अपर प्रधान सचिव ऊर्जा यांनी हरियाणा पटर्न साठी ऑक्टोबर 2023 मध्ये समिती स्थापन केली. ऊर्जामंत्री यांच्या सूचनेनुसार आता त्वरित संघटने सोबत मिटींग घेऊन पुढील आचार संहिता लागण्यापूर्वी सरकारने अंमलबजावणी पाहिजे अशी अपेक्षा उपमहामंत्री राहूल बोडके यांनी व्यक्त केली आहे.














Leave a Reply