पेंढारकर कॉलेज वाचविण्यासाठी शिक्षक, माजी विद्यार्थ्यांचे अर्ध नग्न आंदोलन

Pendharkar College Andolan 2

 

कल्याण : कुणाल म्हात्रे 

पेंढारकर कॉलेज प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समितीच्या माध्यमातून पेंढारकर कॉलेज डोंबिवली जे मूळ अनुदानित आहे, ते विनानुदानित करण्याचा कॉलेज प्रशासनाचा कट आहे. या विरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समिती तर्फे साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाच्या आठव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी अर्ध नग्न होत आंदोलन करत कॉलेज प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

 के. व्ही. पेंढारकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसेच जुनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात ‘सेव्ह पेंढारकर कॉलेज’ असा नारा देत गेल्या आठ दिवसां पासून कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थीनी साखळी उपोषण सुरू केले. 

तर आंदोलनात सहभाग घेतलेल्या शिक्षकांनी हे कॉलेज अनुदानित आहे, ते विनाअनुदानित करण्याचा घाट घातला आहे.  त्याला सरकारची मान्यता नाही, मान्यता नसताना तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनाकडून विनाअनुदानित प्रक्रिया राबविणे सुरू आहे. अनुदानित ज्युनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गास काम न देता एका खोलीत बसविण्याचा प्रकार अन्यायकारक आहे.  यामुळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक भरडले जाणार आहेत, कॉलेज विनाअनुदानित झाल्यावर शैक्षणिक फीमध्ये सवलत असलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागेल.   त्याचा भुर्दंड पालकांना बसेल, त्यामुळे कॉलेजच्या मनमानीविरोधात साखळी उपोषण सुरू करण्यात आल्याचे सांगितले.

तर आज हे अर्धनग्न होण्याची वेळ प्रशासनाने आमच्यावर आणली आहे. 2012 पासून डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाविरुद्ध शेकडो पुरावे दिले गेले, शेकडो समित्या नेमल्या गेल्या, शेकडो आदेश दिले गेले, तरी देखील डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळावर असलेल्या वरदहस्तामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसून त्याविरोधात उपोषणाला बसलो आहोत. पेंढारकर कॉलेजचे खाजगीकरण झाल्यास या धर्तीवर महाराष्ट्रातील इतर सर्व अनुदानित कॉलेज विनाअनुदानित होतील. शिक्षण विभाग, कुलगुरु, प्रकुलगुरू यांच्या डोळ्यांवरील पट्टी आमची अर्धनग्न अवस्था बघून तरी उघडेल का, शेकडो पुरावे देऊन देखील कारवाई होत नसल्याने आज हे अर्धनग्न आंदोलन केले असल्याची माहिती आंदोलनकर्ते माजी विद्यार्थी सोनू सुरवसे यांनी दिली.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *