गरीब मजूर वस्तीतील मुलांसाठी सुरु केली मोफत नर्सरी शाळा
कल्याण : आपण समाजचे काहीतरी देणे लागतो म्हणूनच आपल्या आजुबाजुला असलेल्या गोर गरीब वंचित बांधवांना आपल्या परीने काहीना काही मदत व्हावी या हेतूने कल्याण येथील अपर्णा शिंगटे (नाईक ) यांनी आपल्या संपर्कातील समविचारी महिलांना एकत्र घेऊन आधार फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे . आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कल्याण येथील गोवे नाका परिसरातील गरीब मजूर वस्तीतल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी . पुढे जाऊन या मुलांना शिक्षणाअभावी संघर्ष करावा लागू नये या हेतूने आधार फाऊंडेशन संस्थेच्या वतीने “एक पाऊल शिक्षणाकडे…शिक्षण हक्काचे उज्ज्वल भविष्याचे” या संकल्पनेखाली आज गोवे नाका येथे प्ले ग्रुप , नर्सरी शाळा सुरु करण्यात आली आहे. तेच शालेय शिक्षण घेण्याची ज्या मुलांना ईच्छा आहे . त्यांना देखील संस्थेच्या वतीने सहकार्य करण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा अपर्णा शिंगटे (नाईक ) यांनी सांगितले.

या शाळेच्या उद्घाटनाप्रसंगी समाजसेवक राजाभाऊ पातकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील मुलांना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. रंगीबेरंगी पुस्तक पाहून येथील लहानग्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
















Leave a Reply