न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेतर्फे ठाण्यात हळदी कुंकू समारंभ संपन्न

Whatsapp Image 2025 01 26 At 7.12.52 Pm (2)

ठाणे/प्रतिनिधी – न्यू प्रगती शैक्षणिक संस्था दरवर्षी विविध जनजागृतीपर सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवते. याच परंपरेनुसार यंदाही संस्थेच्या संस्थापिका अनिता ताई खरात यांच्या पुढाकाराने २१ जानेवारी २०२५ रोजी रायगड गल्ली, ठाणे कोपरी येथे महिलांसाठी विशेष हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

या समारंभाला संगीता मालुसरे, अलका जळगावकर, अमृता साबळे, रंजना उतेकर, विनंती मालुसरे, मीना खरात, सरस्वती मालुसरे, सुनीता नाचरे, पूजा कांबळे, दिव्या सावंत, जया मदने, माई काकफले आदी अनेक महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या वेळी अनिता ताई खरात यांनी सर्व महिलांचे स्वागत करत त्यांना शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *