टिटवाळा : श्री मलंगबाबांचा वार्षिक पालखी सोहळा बुधवार, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा होणार आहे. हिंदू मंच ठाणे जिल्ह्याच्या वतीने या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हिंदूंच्या वाढत्या बांधवत्त्वासाठी हा उत्सव महत्त्वपूर्ण मानला जातो. या उत्सावा संदर्भात माहिती देण्यासाठी कल्याण येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .
श्री मलंगबाबांचे समाधीस्थळ हिंदूंचे आहे, असा ठाम दावा हिंदू मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हिंदू परंपरा आणि धर्माची जोपासना करण्याच्या हेतूने हा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. यंदाही मोठ्या संख्येने हिंदू बांधव या उत्सवात सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या सोहळ्यात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी रोजी जोशी बाग येथे शिवसेना बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची विशेष सभा होणार आहे. त्यानंतर, १६ फेब्रुवारी रोजी श्री मलंगबाबांच्या समाधीवर हिंदू मंचतर्फे विधीपूर्वक स्नान आणि पूजा केली जाईल.
या उत्सवात हिंदू संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हिंदूंच्या ऐक्याचा आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे गोपाळ लांडगे – जिल्हा प्रमुख,विजयाताई पोटे – उपनेत्या,लता पाटील व छायाताई वाघमारे महिला जिल्हा संघटक,विश्वनाथ भोईर – आमदार,रवि पाटील- शहर प्रमुख कल्याण पश्चिम,राजेंद्र चौधरी-महानगर प्रमुख, अरावंद मोर – जिल्हाप्रमुख यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .















Leave a Reply