टिटवाळा : मांडा-टिटवाळ्यातील श्री साई गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पदयात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ३० मार्च पासून सकाळी ८ वा . सुरू होणारी ही पदयात्रा ६ एप्रिल रोजी श्रीक्षेत्र टिटवाळा येथे साईबाबांच्या दर्शनाने पूर्ण होणार आहे. साईभक्त, भाविक आणि समाजातील विविध घटकांनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेनंतर १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता साई भंडारा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री साई गणेश मंडळाचे अध्यक्ष किशोर शुक्ला यांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
श्री साई गणेश मंडळाची पदयात्रा आणि पालखी सोहळा; १० एप्रिलला महाप्रसाद















Leave a Reply