शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी तर्फे भव्य सत्कार समारंभ

Whatsapp image 2025 09 05 at 10.31.59 am

यशोदीप विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई विभागीय अध्यक्ष  अनिल आर. पाटील सर सन्मानित 

कल्याण – रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन अभिनव विद्यालय, पारनाका, कल्याण (प.) येथे करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नामांकित संस्था तसेच उपक्रमशील मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला.

यावेळी श्री विघ्नहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदीप विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई विभागीय अध्यक्ष सन्माननीय अनिल आर. पाटील सर यांना “आदर्श संस्थाचालक व आदर्श मुख्याध्यापक” म्हणून विशेष सन्मानित करण्यात आले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सातत्याने काम करून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उभारलेले योगदान लक्षात घेऊन त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

सत्कार रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्षल मकोल, अध्यक्ष निखिल परमार व सेक्रेटरी पूर्वा कुलकर्णी मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवर, समाजकार्य क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था व शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते. अनिल आर. पाटील सरांचा हा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याची समाजाकडून मिळालेली पोचपावती असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *