मांडा-टिटवाळ्यात भाजपा प्रदेश सरचिटणीस परेश गुजरे यांचा आगळावेगळा दिवाळी उपक्रम!

Img 20251023 wa0019

५००० हून अधिक पणती, रांगोळी व सुगंधी उटण्याचे किट वाटप – समाजात नव्या तरुण नेतृत्वाचा प्रभावी ठसा!

टिटवाळा : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव. या पार्श्वभूमीवर मांडा-टिटवाळा परिसरात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस (उद्योग आघाडी) परेश गुजरे यांनी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून समाजात उत्साहाची नवी लाट निर्माण केली आहे. स्थानिक नागरिकांसाठी त्यांनी ५००० हून अधिक पणत्या, रांगोळी व सुगंधी उटणे यांचा आकर्षक “दिवाळी किट” वाटप कार्यक्रम आयोजित केला.

या उपक्रमामध्ये परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. सामाजिक ऐक्य वाढवणारा आणि सणांच्या साजरीकरणात स्थानिक पातळीवर एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला. या निमित्ताने परेश गुजरे यांनी स्वतः भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना भेट देऊन लक्ष्मी देवीची चांदीसदृश्य फ्रेम भेट देत दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

परेश गुजरे यांच्या या आगळ्या वेगळ्या पुढाकाराने फक्त सामाजिक ऐक्यच नव्हे तर जनसंपर्काचाही एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तरुणाईतील जोश, समाजाशी असलेले आपुलकीचे नाते आणि संघटनात्मक बांधिलकी या तिन्हींचा संगम त्यांच्या कार्यशैलीत दिसून येतो.

या उपक्रमानंतर परिसरात चर्चेचा विषय ठरलेले परेश गुजरे हे आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक “नवा, ऊर्जावान आणि संवेदनशील चेहरा” म्हणून उदयास येत आहेत. त्यांच्या या कार्यातून समाजात त्यांच्या नेतृत्वक्षमतेचा ठसा उमटत असून, स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रतिमेत नवा तेजोमय आयाम जोडला गेला आहे.

“दिवाळीच्या आनंदसोहळ्यात समाजाशी नातं घट्ट करणारा प्रकाशस्तंभ म्हणजे परेश गुजरे,” असे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे मांडा-टिटवाळा परिसरात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, सामाजिक क्षेत्रातही नव्या दिशेचा संदेश देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *