कल्याण : रोटरी क्लब ऑफ कल्याणतर्फे कर्णिक रोड येथील छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेच्या पूर्व प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत ‘किलबिल’ बाल उद्यान बनविण्यात आले. चिमुकल्यांना मनोरंजनास शिक्षण घेण्यासाठी उत्साह वाढेल आणि त्यांना आनंददायी शिक्षण घेता येईल, हा यामागचा उद्देश आहे. या उद्घाटनप्रसंगी रोटरीचे जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष राम मराठे, छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेचे सरचिटणीस नीलेश रेवगडे, रोटरी जिल्हा प्रथम महिला माधवी कुलकर्णी, दिलीप कर्डेकर, पराग कापसे, दिपक पटेल, आत्माराम घाणेकर, शोभा घारपुरे, वैशाली परदेशी, जयश्री कर्डेकर, करुणा साबळे, मुख्याध्यापिका भारती वेदपाठक, रेश्मा सय्यद आदी जण उपस्थित होते.














Leave a Reply