शहापूर / चंद्रकांत देसले :
नाणिजधाम दक्षिण पीठाचे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून नरेद्रचार्य संस्थानच्या वतीने “जीवनदान महाकुंभ २०२६” या व्यापक संकल्पनेअंतर्गत रक्तदान महायज्ञाचा संकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने रविवार, दिनांक १८ रोजी इंग्लिश स्कूल, डोलखांब येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिक, भाविक आणि युवकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची जाणीव ठेवत एकूण ६७ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून जीवनदानाच्या या पवित्र यज्ञात सहभाग नोंदवला. शिबिराची संपूर्ण व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पडली.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. रक्तदानासारख्या उदात्त कार्यातून समाजात आरोग्याबाबत जनजागृती व्हावी आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.
नरेद्रचार्य संस्थानच्या या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक संदेश पोहोचला असून “जीवनदान महाकुंभ २०२६” अंतर्गत असेच उपक्रम पुढेही सातत्याने राबविले जाणार असल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.















Leave a Reply