दुर्गम भागातील आदर्श उपक्रम रांजणेकांबे शाळेचा कायापालट!

Whatsapp image 2026 02 09 at 6.32.44 pm

रांजणेकांबे शाळेत नुतनीकरण व सत्कार समारंभ उत्साहात…

शहापूर प्रतिनिधी :  चंद्रकांत देसले

शहापूर तालुक्यातील डोलखांब परिसरातील जिल्हा परिषद शाळा, रांजणेकांबे (केंद्र गुंडे) येथे शाळा इमारतीचे नुतनीकरण तसेच माजी विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार समारंभ सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र विशे व सहशिक्षक वेखंडे यांनी ग्रामस्थ, पालकवर्ग, महिला आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने केले. शिक्षक-ग्रामस्थांच्या एकत्र प्रयत्नातून शाळेचा बदल झाला असून अतिशय दुर्गम भागात असलेल्या या शाळेचा कायापालट करून गावासमोर एक आदर्श उभा केल्याबद्दल पाहुण्यांनी शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक केले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी बी. एच. राठोड, गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे, प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे, विस्तार अधिकारी रामचंद्र विशे, विस्तार अधिकारी शिवानी पवार, उपसरपंच दिनेश रांजणे, ड्यू फाउंडेशनचे उल्हास देवल, केंद्र प्रमुख गुंडे सुरेश ठाकरे तसेच प्रहार पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, विद्यार्थी सुरक्षा समिती, महिला तक्रार निवारण समिती, सखी सावित्री समिती आणि पालकवर्गाने केले.

या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक तसेच भौतिक विकासाला चालना मिळाली असून उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक रवींद्र विशे आणि सहशिक्षक वेखंडे यांच्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *