सहा महिन्यात रक्तदान पेढी सुरु होणार
डोंबिवली ( शंकर जाधव )
इंडियन मेडिकल असोसिएशन आणि केअर १ बाय आर आर हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद देत डोंबिवलीकरांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. यावेळी माजी आमदार रमेश रतन पाटील, विकी रमेश पाटील, डॉ. मंगेश पाटे, डॉ.अर्चना पाटे, डॉ शरद गुरव, श्री राजन मराठे, योगेश पाटील, अरुण जांभळे, कोमल निग्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. मंगेश पाटे म्हणाले, आम्ही डोंबिवलीत केअर 1 इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे ट्रसनी सेंटर सुरु करत आहे.वैद्यकीय सेवयुक्त आणि 100 डॉक्टरांच्या टीमने अत्यंत उपयुक्त आणि वाजवी दरात रुग्णांना परवडेल असे उपचार सुरु करत आहे. शुभ कार्याची सुरुवात लोकउपयोगी कामातून केली जाते.आजच्या काळात रक्तदान हे लोकउपयोगी काम आहे.कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान असते.म्हणूनच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून केअर 1 बाय आर आर हॉस्पिटल येथे रक्तदान शिबीर भरविले.इंडियन मेडिकल असोसिएशन हे दरवर्षी भव्य रक्तदान शिबीर भरवितो.या शिबिरात रक्तसंकलन हे प्लाझा रक्तपेढी येथे केले जाणार आहे.येत्या सहा महिन्यात केअर 1 बाय आर आर हॉस्पिटल येथेही रक्तपेढी सुरु करण्याचा प्रयत्न करू.
सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था ही सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी परवडेल अशा दरात उत्कृष्ठ आरोग्य सेवा दिली जाईल.कोरोना महामारीत नंतर आरोग्य सेवेबाबत खडबडून जागे झाले आहें.या काळात सरकारला आरोग्य सेवेतील अनेक त्रुटी समोर आल्या.या त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहे.केअर1 बाय आर आर हॉस्पिटलही सरकारने अधिकाधिक पाठबळ दिली तर सरकारी योजनातून गरीब रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होईल.तर डॉ. इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवली अध्यक्ष शरद गुरव म्हणाले,केअर 1 बाय आर आराम हॉस्पिटलचे आम्ही आभार मानतो कि अशा प्रकारचे रक्तदान शिबीर आयोजित केले.रक्तदानासाठी जनतेने पुढे आले पाहिजे हा आमचा उद्देश आहे.














jonh
ajay sir ajay sir where Are you going ?