टिटवाळा वासुंदरी रस्त्याच्या कामाबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शहर अभियंत्यांची भेट

कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मांडा पश्चिम  रेल्वे फाटक ते वासुंदरी रोड संदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी  केडीएमसी शहर अभियंता अनीता परदेशी तसेच कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांची भेट घेतली.

कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मांडा पश्चिम रेल्वे फाटक ते वासुंदरी रोड येथील हा गावात जाणारा एकमेव रस्ता  शासकीय विभागांच्या  एकमेकांच्या वादामुळे रखडला आहे.  एमएमआरडीए, अमृत योजना तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्येच एक मत नसल्यामुळे तेथील नागरिकांचे हाल होत आहे. या सर्वांची तक्रार करण्यासाठी आज केडीएमसी शहर अभियंता अनीता परदेशी यांना तक्रार केली असता, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. उद्यापासूनच प्रत्यक्षात काम करण्याचे सकारात्मक आश्वासन परदेशी यांनी दिले.

याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष काळन, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कल्याण पश्चिम कार्याध्यक्ष प्रशांत माळी, माजी नगरसेवक जयवंत भोईर, समाजसेवक ग्रामस्थ राम भोईर, सद्गुरु मडवी, सतीश देशेकर, भालचंद्र पाटील, दिनेश पाटील, संतोष भोळे, व केडीएमसी कार्यकारी अभियंता जगदीश कोरे व कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *