सेव्ह पेंढरकर कॉलेज मोहिमे माध्यमातून प्रशासनाचे तेरावे व मुंडण
कल्याण : कुणाल म्हात्रे
सांस्कृतीक नगरी म्हणुन सर्वत्र डोंबिवलीची ख्याती आहे. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे के.व्ही.पेंढरकर कॉलेज हे खाजगी करण्याचा कुटील घाट प्रभाकर देसाई यांनी घातलेला आहे. गेल्या १३ दिवसांपासून “सेव्ह पेंढरकर कॉलेज” साखळी उपोषण सुरू आहे. आज दुपारी मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग, संचालक उच्च शिक्षण विभाग, सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, कुलगुरू मुंबई विद्यापीठ, धर्मदाय आयुक्त सार्वजनिक न्यास व डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ यांचे जाहीर धिक्कार करत १३ वे घालण्यात आले. यावेळी विधिवत पूजा मंत्र पठण करून नंतर प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी जाहीररित्या मुंडण केले.
महाविद्यालयाचे खासगीकरण न करता शासकीय अनुदान बंद न करता ते कायम स्वरुपी अनुदानित राहावे व संपूर्ण व्यवस्थापन मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा म्हणून आज तेरावा घालण्यात आला. यावेळी सेव्ह पेंढरकर मोहीमचे संयोजक रोहिदास (सोनू) सूरवसे, विशाल शेटे, काळू कोमास्कर, सत्यवान म्हात्रे, मधुकर माळी, पेंढरकर कॉलेजचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.














Leave a Reply