डोंबिवलीकरांची आरोग्यदायी मैत्रीची “धाव”

डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४ अंतर्गत डोंबिवलीकर घेणार सहभाग

कल्याण : कुणाल म्हात्रे 

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा माध्यमातून  डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली रनर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीकरांसाठी आरोग्य आणि मैत्री दिनाची सांगड घालत ४ ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवलीमधील सर्वात मोठ्या “डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४” चे  आयोजन केले आहे.

चालणे, धावणे किंवा पळणे आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. धकाधकीच्या शहरी वातावरणात  आपल्या शरीराला व्यायाम अत्यावश्यक आहेच असं आरोग्यविज्ञान सांगते आणि त्यासाठी चालणे, धावणे किंवा पळणे यापेक्षा उत्तम काहीच नाही आणि हाच मूलमंत्र रुजवण्यासाठी नामदार रविंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. “डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४” ही स्पर्धा २१ किमी, १० किमी, ५ किमी  आणि १.६ किमीचा फन रन या टप्प्यांत आयोजित होणार आहे. १.६ किमी चा फन रन हे या कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे. जेथे ६ वर्षांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असेल. रविंद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली रनर ग्रुप तर्फे शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था इत्यादींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन  करण्यात येत आहे. या मध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरावा यासाठी कल्याण डोंबिवली रनर ग्रुप प्रयत्नशील आहे.

डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन मधील सहभागींना रविंद्र चव्हाण आणि सेलिब्रेटी रनर्स भेटण्याची आणि त्यांच्यायासोबत धावण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम फक्त स्पर्धा नसून आरोग्य आणि मैत्रीचा उत्सव असणार आहे. सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला इ प्रमाणपत्र आणि सहभाग पदक मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *