कल्याण : कुणाल म्हात्रे
जाणता प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा अशा अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे. दरवर्षी शाळा सुरू होते त्या जून महिन्यापासून शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्य जाणता प्रतिष्ठान या एनजीओ मार्फत चालू असते. नुकतेच ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील शेरे या गावी जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी गणेश टिकम यांनी मुलांना योगासनाचे धडे दिले. तसेच ललिता मोरे यांनी मुलांना भविष्याबद्दल मार्गदर्शन केले. जाणता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर ताम्हणकर यांनी या वर्षी ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग इ.जिल्ह्यात गरजू विद्यार्थ्यांना १ लाखाहून अधिक वह्या वाटण्याचे काम सुरू आहे याची माहिती दिली आणि सर्व दात्यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी जाणता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर ताम्हणकर, महिला महाराष्ट्र प्रदेश प्रमुख ललिता मोरे,सचिव राम चौहान, रोहित महाले, गुरुनाथ भंडारी, प्रेम डोंगरे, ज्ञानेश्वरी ताम्हणकर, धीरज घागरे, गणेश टिकम, भूषण पांडे इ.पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.














Leave a Reply