कल्याणमध्ये श्री सदस्यांचे वृक्षारोपण

कल्याण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी लिव्हिंग लिजेंड पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड व ग्रामपंचायत कांबा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी  ग्रामपंचायत कांबा हद्दीतील श्री क्षेत्र सिध्देश्वर मंदिर, पाचवा मैल येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन अभियान कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्याहस्ते वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी कांबा ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच छाया बनकरी, ग्रामविकास अधिकारी सुनंदा पाटील, श्री सिध्देश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देवराम शिरोसे, कांबा ग्रामपंचायतीचे कर्मचारी व प्रतिष्ठानचे श्रीसदस्य उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या १२५ श्रीसदस्यांच्या सहभागातून विविध प्रकारच्या १५० झाडांची लागवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *