डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवलीतील के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयासमोर माजी विद्यार्थी यांनी सेव पेंढारकर’ अंतर्गत बेमुदत साखळी उपोषण केले. शुक्रवार 5 तारखेला या उपोषणाचा 21 वा दिवस आहे.शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या आंदोलनाची दाखल सरकारने घेणे आवश्यक होते.शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडील आमदार, विरोधी पक्ष नेते, आमदार आदित्य ठाकरे यांना सदर आंदोलनात विधान भवन आणि विधान परिषदेत आवाज उठविण्यासाठी देणार निवेदन असल्याचे माजी आमदार भोईर यांनी सांगितले.
डोंबिवलीतील के.व्ही. पेंढारकर महाविद्यालय येथे माजी व विद्यार्थी सोनू सरवसे, विशाल शेटे हे मागील 21 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण करत आहेत. शुक्रवार 5 तारखेला उपोषणाच्या 21 व्या दिवशी माजी आमदार सुभाष भोईर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
यावेळी माजी आमदार भोईर म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे यांना या आंदोलनाची माहिती दिली आहे. विधानसभेत आमच्या पक्षाचे आमदार हे याबाबत आवाज उठवीला जाणार असून पीडित शिक्षक व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करील.














Leave a Reply