कल्याण : महायुती सरकारने नव्याने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ग्रामपंचायत किसळ – पारगाव मध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी सरपंच डॉ कविता वरे यांनी पुढाकार घेऊन गुरूवारी ग्रामपंचायत कार्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नागरिकांना या योजनेची योग्य माहिती मिळावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. शेतीचे काम चालू असतानाही मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शविली व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमाला संपूर्ण ग्रामपंचायत बॉडी, ग्रामसेवक व माजी सभापती दीपक पवार तसेच माजी सरपंच जयवंत पडवळ व माजी उपसरपंच हरीचंद्र पडवळ उपस्थित होते.














Leave a Reply