कल्याण : कुणाल म्हात्रे
कल्याण पश्चिम येथील ब्रायटन वर्ल्ड स्कूलमधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी सुजित मच्छिंद्र राठोड याची दहावीची शैक्षणिक वर्षाची फी भरून सुद्धा गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला दिला गेला नव्हता. कोविड काळातील मागील फी बाकी असल्याचे कारण सांगून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या शाळेमध्ये रीतसर अर्ज देऊन सुद्धा व्यवस्थापनाकडून कोणतेही सहकार्य न केल्याने, या शाळेत सामाजिक कार्यकर्ते गणेश नाईक यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत ठिय्या आंदोलन करून गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यास मिळवून दिला.
यावेळी खडकपाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने हा विषय लवकर मार्गी लागला. यावेळी पोलीस बॉईज ठाणे जिल्हा अध्यक्ष उमेश भारती, मनसेचे सतीश मोरे, राहुल काळे, देवेंद्र काळे, ईश्वर राठोड, अमोल राऊळ, प्रदीप चन्ने, लोकेश शिंदे व इतर सहकारी उपस्थित होते.














Leave a Reply