कल्याण : कुणाल म्हात्रे
योग्यता प्रमाणपत्र ( रिक्षा टॅक्सी फिटनेस ) साठी विलंबशुल्क प्रतिदिन 50 रुपये आकारण्यात येत होते. त्या संदर्भात भाजपा वाहतूक संघटना रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती कल्याण च्या पाठिंब्यावर पन्नास रुपये प्रति दिन विलंब शुल्क माफ होत नाही तोपर्यंत उपोषण करण्यात येणार होते. ते न करता आज रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती कल्याण च्या वतीने निदर्शने करण्यात आले.
पूर्ण महाराष्ट्रात विलंबशुल्क पन्नास रुपये प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारण्यात येत असल्याकारणाने रिक्षा टॅक्सी चालकाचा जन आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी कल्याण आरटीओ येथे एक दिवसीय निदर्शने करण्यात आली. जर तरीही केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी याबाबत फेरविचार केला नाही तर रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने 8 दिवसात जो ही निर्णय घेण्यात येईल त्याप्रमाणे कल्याण मध्ये आंदोलन होईल किंवा रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती कल्याण यांच्या वतीने जोपर्यंत सरकार फेरविचार करत नाही तोपर्यंत उपोषण करण्यात येईल असा इशारा रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघर्ष कृती समिती कल्याण यांच्या वतीने देण्यात आला.
निदर्शन करण्यासाठी भाजपा वाहतूक संघटना प्रदेश अध्यक्ष विल्सन काळपुंड, संघर्ष ऑटो रिक्षा सेना ठाणे जिल्हाध्यक्ष महेंद्र मिश्रा, रिपब्लिक रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना कल्याण शहराध्यक्ष मोहन पाठारे, रयत वाहतूक संघटना अध्यक्ष राहुल वारे, न्यू आदर्श राष्ट्रवादी रिक्षा चालक-मालक संघटना कल्याण शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, आरपीआय वाहतूक आघाडी ( आ ) कार्याध्यक्ष अरविंद अंगारखे, आप रिक्षा चालक संघटना कल्याण शहर अध्यक्ष निलेश व्यवहारे, रिक्षा चालकाचे जनसेवक सदाशिव सोनवणे यांच्या नेतृत्वात कल्याण आरटीओला निदर्शने करण्यात आली.














Leave a Reply