कल्याण :
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी कल्याण (पूर्व) कोळसेवाडी परिसरातील ग्रेट कल्याण ढाबा, ढाबा डॉट कॉम व पंचायत ढाबा असे एकूण ३ ढाब्यांवर निष्कासनाची कारवाई नुकतीच केली. ही कारवाई अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने आणि १ जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.
तसेच आय व ई प्रभागातही सहा.आयुक्त किशोर ठाकुर, चंद्रकांत जगताप व परिमंडळ-२ च्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी परिमंडळ-२ चे उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण शीळ रोड व मानपाडा रोड या रस्त्यावरील अतिक्रमण ठरणारे फेरीवाले, टप-याधारक, दुकाना समोरील वेदरशेड व गॅरेज इत्यादींवर संयुक्तिक कारवाई नुकतीच केली. हि कारवाई आय व ई प्रभागातील अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी, महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जेसीबी, १ डंपर व १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.














Leave a Reply