आपत्कालीन परिस्थितीत त्वरेने व समन्वयाने काम करण्याचे दिले निर्देश
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील इन्टीग्रेटेड कंट्रोल ॲन्ड कमांड सेंटरमध्ये आज महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी अधिकारी वर्गाची बैठक घेऊन तेथील कार्यपध्दतीची पाहणी केली आणि आपत्कालीन परिस्थितीत सर्व अधिका-यांनी त्वरेने आणि समन्वयाने काम करावे अशा सुचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी वर्गास दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त – 1 प्रल्हाद रोडे, अतिरिक्त आयुक्त – 2 तथा नोडल अधिकारी आपत्ती व्यवस्थापन धैर्यशील जाधव, शहर अभियंता अनिता परदेशी तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
महापालिका क्षेत्रात होणारी संभाव्य अतिवृष्टी, सखल भागात साचणारे पावसाचे पाणी या अनुषंगाने उद्भवणा-या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्टीग्रेटेड कंट्रोल ॲन्ड कमांड सेंटर मध्ये मुख्य नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून पावसाळयातील आपत्कालीन परिस्थितीत इन्टीग्रेटेड कंट्रोल ॲन्ड कमांड सेंटर हे महत्वाचे मुख्य नियंत्रण केंद्र राहील. यामध्ये महापालिका अधिकारी वर्गाच्या नियंत्रणाखाली एक पथक गठीत करण्यात आले असून या केंद्रामध्ये सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी नेमणूका केलेल्या अधिकारी/कर्मचा-यांनी या केंद्रामधून प्राप्त होणारे संदेश संबंधित यंत्रणेकडे जलदगतीने पोहोचविण्याचे काम करावे, अशाही सुचना आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी दिल्या.














Leave a Reply