कल्याण : पेंढरकर महाविद्यालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्यावर मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल असून गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार आहेत. के. व्ही. पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. या विरोधात सेव्ह पेंढरकर कॉलेज हि मोहीम डंबिवलीकरांच्या वतीने राबविण्यात येत आहे.
याप्रकरणी शिक्षण संचालक पुणे यांनी महाविद्यालयावर प्रशासक का नेमू नये म्हणून प्रभाकर देसाई यांना कारणे दाखवा नोटिस बजावली असून उद्या बुधवार दिनांक 10 जुलै रोजी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई हे शिक्षण संचालक पुणे यांच्या कारणे दाखवा नोटिसला उत्तर देण्यासाठी पुणे येथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या प्रभाकर देसाई यांना पोलीस प्रशासनाकडून अटक होणार असल्याची चर्चा डोंबिवलीत रंगली आहे.














Leave a Reply