डोंबिवली ( शंकर जाधव ) :
दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिमेकडील कैलासनगर येथील डॉ. सर्वेश शाहू सावंत यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयात गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी माजी नगरसेविका सीमा सावंत, डॉ. सर्वेश सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या. यावेळी डॉ. सर्वेश सावंत म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या सक्षम शिक्षित भारत या उद्देशाने हा उपक्रम वर्षानुवर्षे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण राबवित आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्या या उपक्रमात सहभागी होत असतो. होतकरू विद्यार्थ्यांना शालेय जीवनात याचा नक्कीच लाभ होईल.














Leave a Reply