डोंबिवली ( शंकर जाधव ) :
सुमित डोंबिवलीतील सक्रिय कार्यकर्ते सुमित बबन कनकुटे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) डोंबिवली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक (भाऊ ) निकाळजे यांच्या हस्ते कनकुटे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. कनकुटे यांनी अनेक सामाजिक कार्यात आपले योगदान दिले असून गोरगरीबांसाठी आपला मदतीचा हात असेल असे राष्ट्रीय अध्यक्ष निकाळजे म्हणाले. तर कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष योगेश गायकवाड यांनी कनकुटे यांना शुभेच्छा देत जनतेच्या समस्या सोडवा असा सल्ला दिला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनवर शेख,
कल्याण शहर अध्यक्ष (प ) राजेश चंदनशिवे,भिवंडी उपाध्यक्ष नरेश गायकवाड,टिटवाळा शहर अध्यक्ष पंकज जाधव, कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष सन्नी लोंढे,जिल्हा संघटक सलीम शेख,इंद्रानगर अध्यक्ष समीर शेख, अक्षय गायकवाड, नेहाल सिंग,शाहिद पाठण,सय्यद खान,राज तायडे,मयूर आहिरे,रोहित पगारे,सेमीचंद वाघमारे,प्रदीप तायडे,मयूर मोरे, यश कनकुटे,योगेश लोखंडे,अर्जुन पाईकराव,प्रवीण वाघमारे,स्वप्नील गायकवाड,मयूर पंडित आदी उपस्थित होते.














Leave a Reply