डोंबिवली ( शंकर जाधव ) :
डोंबिवली पूर्वेकडील पी अँड टी, डोंबिवली येथील होली एंजल्स शाळेत 2023-24 ला झालेल्या सीबीएससी बोर्डाच्या इयत्ता दहावी च्या परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा पार पडला. यावेळी संस्थाचालक डॉक्टर ओमन डेव्हिड, ट्रस्टी लीला ओमेन, प्राचार्य बिजॉय ओमेन, मुख्याध्यापिका रफत शेख, विद्यार्थी शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते.संस्थापक डॉक्टर ओमेन डेव्हिड यांनी मुलांना ट्रॉफी पुष्पगुच्छ व डॉ.ओमन डेव्हिड जीवन (H चरित्रावर आधारित पुस्तक ‘Doctor Commen Devid_A man of substance ‘या पुस्तकाची एक-एक प्रत देण्यात आली.
यावेळी प्राचार्य बिजॉय ओमेन म्हणाले, मुलांचे, पालकांचे व दहावीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन. मेरिटमध्ये येणाऱ्या व 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ते म्हणाले, यापुढेही असेच यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवा. विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा.इयत्ता दहावी व बारावीचा गेल्या कित्येक वर्षापासून लागणाऱ्या शाळेच्या शंभर टक्के रिझल्टचे सातत्य याही वर्षी राखले गेले आहे यासाठी शिक्षक व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
यावेळी मेरिटमध्ये आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणारे श्रेयस शाम अय्यर (९८.८०), आर्या केदार देवधर (९६. ८०), हितांशू राजेश हातीसकर (९५.८०) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉक्टर ओमेन डेविड सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे, मुलांचे, पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आणि त्यांनी सांगितले की, शहरातील विद्यार्थ्यांना कॉलेजसाठी मुंबईकडे धाव घ्यावी लागते कारण डोंबिवली येथील कॉलेजेसची संख्या पुरेशी नाही. याच विचाराने प्रेरित होऊन आता येथे कॉलेज सुरू केले आहे. शाळेप्रमाणेच कॉलेजची गुणवता उत्तम राखण्यात येईल. अशक्य काहीच नाही सातत्याने प्रयत्न करत रहा यश तुमचेच आहे. समाजातील गरजूंना मदत करण्याची वृत्ती बाळगा असे सांगून उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माध्यमिक विभागाच्या शिक्षिका रेवती अय्यर यांनी सांभाळली.














Leave a Reply