डोंबिवलीतील रस्त्यामधील खड्डे भरताना थुकपट्टी लावण्याचे काम

भाजपा पदाधिकारी राहुल सकपाळ यांनी विचारला जाब 
डोंबिवली ( शंकर जाधव )
पावसाळा सुरु झाल्याने डोंबिवलीतील अनेक रस्तावर खड्डे पडल्याचे दिसते. वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम सुरु असले तरी ते काम करताना ठेकेदार थूकपट्टी लावत असल्याने भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ सचिव राहुल सकपाळ यांनी ठेकेदाराला जाब विचारला. डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा येथे खड्डे बुजविण्याचे काम करता असताना सकपाळ यांनी he काम चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याचे सांगितले.
  डोंबिवली पश्चिमेकडील रस्त्यावर खड्डे पडले असून खड्डे बुजवितात त्यातील पाणी न काढता त्याचच डांबर टाकून रोडरोलर फिरलला जात आहे. गरीबाचा वाडा, गोपीनाथ चौक, दोन टाकी,मांगल्य कॉम्पल्स समोरील रस्त्यामध्ये खड्डे पडले आहे. भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ सचिव राहुल सकपाळ यांनी काम सुरु असलेल्या ठिकाणी पाहणी केली. ठेकेदार खड्ड्यातील पाणी न काढता त्याच डांबर टाकून खड्डा बुजवला जात आहे. मात्र हि कामाची पद्धत नसून ठेकेदार काम व्यवस्थित करत नाही. अशा ठेकेदाराला पालिका प्रशासन का काम देते? रस्ता नीट बनविला जात नसल्याने  पावसाळ्यात खड्डे पडतात. हे किती वर्ष सुरु राहणार? जनतेले हे मान्य नाही. यावर आम्ही आवाज उठवीला असून पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविताना योग्य पद्धतीने बुजविणे आवश्यक आहे.
  दरम्यान, अशा प्रकारे काम सुरु असताना पालिकेचा एकही अधिकारी कामाची प्रत्यक्ष पाहणी करत नाही. रस्त्यावरील खड्डे बुजविताना ठेकादार उत्कृष्ट काम करत आहे कि नाहीं याची नोंद पालिका प्रशासन घेत नसल्याने ठे केदार आपल्या मर्जीने काम करत असताना दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *