गंधर्व गुरुकुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काव्य वाचन स्पर्धेला भर पावसातही उत्स्फूर्त असा प्रतिसाद

टिटवाळा: गंधर्व गुरुकुल वतीने आणि रेड स्वस्तिक सोसायटीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या काव्य वाचन स्पर्धेला भर पावसातही उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाह्यला मिळाला . मुक्त छंदात विविध विषयांवर सादर केलेला कवितांना उपस्थितांनी मनमुराद अशी दाद देत या कार्यक्रमाचा आनंद लुटला .शनिवार दिनांक 13 जुलै 2024 रोजी खुली मराठी काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन टिटवाळा येथील प्रथमेश मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण साधारण २५ च्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता . विशेष म्हणजे या दिवशी जोरदार पाऊस असताना देखील २२ स्पर्धकांनी हजेरी लावत आपली रचना सादर करत या कार्यक्रमात विशेष रंगत आणली. सहभागी स्पर्धकांनी छ . शिवाजी महाराज , आई , पाऊस , प्रेम यांसारख्या विविध विषयांवर दमदार कविता सदर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली . रत्नागिरी , गिरगाव-मुंबई , शहापूर , वासिंद ,उल्हासनगर,भिवंडी ,कल्याण आणि टिटवाळा येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

Green Modern Friends Friendship Photo Collage

या स्पर्धेसाठी सेवानिवृत्त शिक्षक व साहित्य क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार मिळवले रमेश तारमळे हे परीक्षक म्हणून लाभले होते. एकूण तीन क्रमांक या स्पर्धेत काढण्यात आले. संसराच्या रहाटगाड्यात एक स्त्री ही आई , पत्नी , सून या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिचे स्वत:चे जगणे मात्र ती सगळ्यात कुठेतरी हरवून जाते या आशयावर आधारित सादर केलेल्या मीनल कांबळे यांच्या राहून गेले या कवितेला पहिला क्रमांक मिळाला, तर दुसरा क्रमांक विजय पिळकर यांच्या बालपण या कवितेला मिळाला या कवितेत त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणीतले विविध पदर उलगडत गावाकडच्या आठवणीना उजाळा देत एका वेगळ्याच भावविश्वात नेले. कुणाल जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित राज म्हंटल की या कवितेने छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे शूरवीर मावळे यांच्या पराक्रमाची याशोगाथा या कवितेतून सादर करत तिसरा क्रमांक मिळाला . विजयी स्पर्धकांना गंधर्व गुरुकुलच्या वतीने स्मृतीचिन्हे आणि प्रमाणपत्र तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. तर सहभागी झालेल्या सर्वच कवींनी उत्तम अश्या रचना सादर केल्या . परीक्षक असलेले तारमाळे सर यांच्या मी झाडू मारला नाही या कवितेने रसिकांची उत्तम अशी दाद मिळवली . सुमेध जाधव यांच्या खुमासदार निवेदनाने या कार्यक्रमात विशेष रंगत आणली होती. तर सिद्धी गावडेकर यांनी सादर केलेल्या एका सुंदर अश्या गीताने कार्यक्रमाची सांगाता झाली.

Light Blue White Clean Grid Family Photo Collage

 

या कार्यक्रमासाठी टिटवाळा विभगातील समाजसेवक दीपकभाऊ कांबळे,विनोद इंगळे , प्रविण वाणी ,किशोर पाटील ,भरत दळवी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी गंधर्व गुरुकुलच्या संस्थापिका वैदेही नांदगावकर यांनी सांगितले की २०१६ साली एका लहानश्या कार्यक्रमाने गंधर्वची सुरुवात करण्यात आली होती. मात्र आज त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून आमची ऊर्जा आणखी वाढली आहे . इथल्या स्थानिक कलावंताना व्यासपीठ मिळावे या एकाच उद्देश्याने हा मंच स्थापन करण्यात आला होता आणि तो उद्देश आज सफल होताना दिसत आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गंधर्वचे प्रमोद नांदगावकर यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम संपन्न केला .त्याचबरोबर संतोषी जाधव, लखन जगताप , मुकुंद नावकर , सुनील गोडांबे यांचे देखील विशेष सहकार्य लाभले

 

Light Blue White Clean Grid Family Photo Collage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *