डोंबिवली ( शंकर जाधव )
विट्ठल विट्ठल जय हरि विट्ठल नादघोष करत विठूमाऊलीचे साधक पंढरित दाखल होत असताना के रा कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नामक ज्ञानपंढरित सोमवार 15 तारखेला उत्तम व सकस आहाराविषयक जनजाग्रुती दिंडी काढण्यात आली. आमची वारी शिक्षणाची ,आमची वारी आरोग्याची , आमची वारी सकस आहाराची या घोषणांचा गजर करत ज्ञानपंढरिचे विद्यार्थीरूपी वारकरी मिलाप नगर परिसरातून मार्गस्थ झाले.पँक फूड, जंग फूड टाळत सकस व पौष्टिक अन्न घटकांचे सेवन यांविषयक फलकांचे प्रदर्शन करण्यात आले.पारंपारिक वेशभूषेत , डोक्यावर तुळस घेतलेले विद्यार्थी , मुख्याध्यापिका संगीता पाखले व सर्व शिक्षकांनी अभंग गान करत आरोग्यदींडीचे समापन झाले.














Leave a Reply