नाभिक समाज संघटना ( डोंबिवली ) चा शैक्षणिक कामात मदतीचा हात

डोंबिवली ( शंकर जाधव ) : नाभिक समाज संघटना ( डोंबिवली ) नेहमीच आपले सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलत असते. गरजू विद्यार्थ्याना मदतीचा हात म्हणून कायम त्यांची साथ देत असतो असे संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब राऊत यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून नाभिक समाजातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. डोंबिवली पूर्वेकडील स. वा. जोशी विद्यालयाजवळील श्री संत सेना सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष बाबासाहेब राऊत, उपाध्यक्ष रमेश वखटे, सचिव मंगेश पोफळे, सहसचिव अशोक आतकरे, खजिनदार प्रकाश ( बाळा ) पवार, सहखजिनदार तुषार शिंदे, विशस्त मंडळात दशरथ चित्ते, संतोष आवटे, शिवाजी वैद्य, कृष्णा कारूडकर, संतोष शर्मा आणि उत्सव समितीत सोमनाथ वरपे, कृष्णा कदम, महेश काशीद, संतोष खंडागळे, रईस सलमानी, आसाराम अतकरे, दादाभाई महाले, बाळा झामरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *