डोंबिवली ( शंकर जाधव )
जास्तीत जास्त महिलांना “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण “योजनेचा लाभ मिळण्याकरिता, निवडणूक प्रभाग निहाय 366 केंद्रांत तसेच एकूण 28 नागरिक आरोग्य केंद्रांत,महापालिकेच्या १० प्रभागात, तसेच २७७ अंगणवाडी केंद्रात मदत कक्ष उघडून सदर योजना राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिलेले आहेत, त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच माजी पालिका सदस्य यांचे समवेत नुकतीच महापालिकेच्या आचार्य अत्रे रंग मंदिरात एक बैठक संपन्न झाली. सदर बैठकीतील उपस्थितांना “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन या योजनेचे ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज कसे भरावेत याबाबत महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे कुलकर्णी व सुषमा खरात- मुख्य सेविका एकात्मिक बालविकास प्रकल्प यांनी मार्गदर्शन केले.
आज पर्यंत सदर योजनेचे एकूण ६३०४ ऑनलाईन अर्ज व एकूण ११६०८ ऑफलाईन अर्ज भरण्यात आले आहेत. महिला बचत गटांमार्फत भरण्यात येणाऱ्या प्रत्येक ऑनलाइन फॉर्म मागे रु.५०/- इतके मानधन देण्यात येणार आहे .तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रुपये २,५०,०००/- च्या आत असेल अशा कुटुंबातील महिलांनी (वय वर्षे २१ते ६५) तसेच केशरी व पिवळे रेशन कार्डधारक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे.














Leave a Reply